पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात कोण विजयी?

विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघातून भाजपचे अनिल सोले हे विजयी झालेत. त्यांनी काँग्रेसचे बबन तायवडे यांचा 31 हजार मतांनी पराभव केलाय.

Updated: Jun 25, 2014, 12:30 PM IST
पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात कोण विजयी? title=

मुंबई : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघातून भाजपचे अनिल सोले हे विजयी झालेत. त्यांनी काँग्रेसचे बबन तायवडे यांचा 31 हजार मतांनी पराभव केलाय.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण विजयी झालेत. त्यांनी भाजपच्या शिरीष बोराळकरांचा पराभव केलाय. 

तर पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपचे चंद्रकांत पाटील विजयी झालेत. त्यांनी सारंग पाटील यांचा पराभव केला. 

पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत दत्तात्रय सावंत विजयी झालेत. तर अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत श्रीकांत देशपांडे विजयी झालेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.