मुंबई : 'झी २४ तास'ने घोटाळ्यांचा पर्दाफाश केलेल्या मुबैं बँकेची चौकशी होणार असल्याची घोषणा सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी केलीय.
सहकार विभागामार्फत ही चौकशी होणार आहे. मात्र मुंबै बँकेतल्या विविध घोळांची यापूर्वीच दोनदा सरकारनं चौकशी केली आहे. त्यामध्ये संचालक मंडळांना दोषी ठरवून संबंधितांकडून घोटाळ्याची रक्कम वसूल करण्याचा अहवाल सादर करण्यात आलाय.
मात्र यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. सरकारनं केवळ वेळकाढू धोरण अवलंबत पुन्हा एकदा टेस्ट ऑडीट सुरू केलंय. मात्र प्रत्यक्ष कारवाईच्या नावानं बोंबाबोंबच आहे. सरकारनं यावपूर्वीच्या अहवालांवर कारवाई करण्याचं सोडून आता पुन्हा चौकशीची घोषणा केल्यानं हा सर्व फार्स असल्याचं पुढं आलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.