चंद्रपूर : सुट्यांचा हंगाम आणि नवीन वर्षाची धूम दारुबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या दारु तस्करांना हुरूप देणारी ठरत आहे अशीच लक्षणं दिसून येत आहेत.
शेजारच्या जिल्ह्यातून दारू तस्करीसाठी नवनवे प्रयोग चंद्रपूरमध्ये केले जात आहेत. एका रेकॉर्डवरच्या दारू विक्रेत्याने दुचाकीवरुन शेगडी विक्रीच्या बहाण्यानं एक खास डबाच तयार करून घेतला होता. मात्र त्याची चलाखी चाणाक्ष पोलिसांपुढे चालू शकली नाही आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
पोलिसांनी पाळत ठेऊन तब्बल २० किलोमीटर पर्यंत या तस्कराचा पाठलाग करुन त्याला अटक केली. त्याच्याकडून तस्करीच्या दारुच्या ५ पेट्या पोलिसांनी जप्त केल्या. एका खेपेमागे तो अंदाजे १ लाखांची कमाई करत असल्याचं उघड झालंय.