www.24taas.com, झी मीडिया, जळगाव
सरकारने पन्नास लाखांची राष्ट्रीय पेयजल योजना गावासाठी दिलीय. त्यातील २६ लाख रुपये योजनेवर खर्चही झाले. मात्र ही पाणी योजना गावात शोधूनही सापडत नाही. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातल्या वसंतनगरचे ग्रामस्थ हैराण झालेत.
पारोळा तालुक्यातलं पाच हजार लोकवस्तीचं वसंतनगर गाव. डोंगरी भागात असलेल्या या गावातल्या लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारनं २०१० मध्ये ४९ लाख ९७ हजार ४२७ रुपये खर्चाची राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर केली. त्यापैकी २६ लाख रुपये या योजनेवर खर्चीही झाले. मात्र गावात कुठेही पाईप लाईन दिसत नाही. ७५ हजार लिटर्स क्षमतेचा जलकुंभही दिसत नाही. याबाबत माहितीच्या अधिकारात माहितीही द्यायला अधिकारीही तयार नाहीत. त्यामुळे सरपंच आणी अधिका-यांनी संगनमत करून कागदावर ही पाणी योजना दाखवून लाखोंचा निधी हडप केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय.
योजनेसाठी सुमारे तीन किलोमीटर अंतर पाईपलाईन प्रस्तावित आहे. तिचा कुठे थांगपत्ता नाही. पम्पिंग हाऊसही नाही. मात्र, योजनेचं काम सुरु असल्याच अधिकारी छातीठोकपणे सांगताहेत. सरकारचा लाखोंचा निधी अशा मोठ्या योजनांवर खर्च होतोय. पण त्याचा लाभ गरजूंना मिळत नाहीए. कारण भ्रष्टाचाराचं पाणी अधिकारी आणि पदाधिका-यांनामध्ये मुरताना दिसंतय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.