www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागच्या वेळी केलेल्या नाशिक दौऱ्यादरम्यान ९ जुलै रोजी पुन्हा नाशिकमध्ये दाखल होण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, आता त्यांना आपला दौरा पुढे ढकलावा लागलाय.
राज्यातील महत्त्वाचे पदाधिकारी व अन्य आमदार विविध जिल्ह्यांचे दौरे करीत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी आपला ९ जुलैपासून सुरू होणारा दौरा १८ जुलैपासून सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. राज ठाकरेंच्या या दौऱ्यादरम्यान जिल्ह्यासह शहरातील पदाधिकाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. नाशिक महापालिकेत मसनेने सत्ता स्थापन केल्यापासून राज ठाकरे सतत विकास कामांवर लक्ष ठेवून आहे. नाशिक दौऱ्यावर आल्यानंतर मनपा आयुक्तांसह महापौर आदी महत्त्वांच्या व्यक्तींशी चर्चा करुन विकासकामांचा आढावा घेतात. गेल्या जून महिन्यात दोन दिवसांसाठी नाशिक दौऱ्यावर असताना ९ जुलैला पुन्हा येणार असं आश्वासन राज ठाकरे यांनी दिलं होतं. त्यामुळे पदाधिकारी व मनसैनिकांमध्ये उत्सुकता होती.
मात्र, व्यस्त कार्यक्रम व पदाधिकारी तसेच आमदार राज्याच्या दौऱ्यावर असल्याने ते आता १८ जुलैनंतर नाशिक दौरा करू शकतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील कराड, सांगलीसह विविध जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांमध्ये फेरबदल करून आगामी निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आल्याने आता नाशिकमधील पदाधिकाऱ्यांमध्ये बदल होणार आहे. जिल्ह्यासह शहरातील पदाधिकारी बदलून नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.