www.24tass.com , झी मीडिया, मॉस्को
जगात सर्वाधिक पैसा कमावणारी खेळाडू म्हणून प्रसिद्ध टेनिसपटू मारिया शारापोव्हानं फोर्ब्सच्या यादीत अव्वल स्थान पटकावलंय. रशियाची स्टार खेळाडू असलेल्या शारापोव्हानं तब्बल नवव्या वर्षीही आपलं स्थान कायम ठेवलंय.
फोर्ब्सनं नुकतीच ही यादी जाहीर केलीय. यादीनुसार जून २०१२ ते जीन २०१३ दरम्यान शारापोव्हानं २.९ कोटी डॉलरची कमाई केलीय. शारापोव्हाच्या कमाईत तिनं कमावलेल्या सर्व पुरस्कारांची आणि जाहिरातीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश आहे.
अमेरिकेतील जगप्रसिद्ध टेनिस स्टार सेरेना विल्यियम्स यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. तिनं यावर्षी २.०५ कोटी डॉलरची कमाई केलीय. याशिवाय १.८२ कोटी डॉलर कमवत चीनची टेनिसपटू तिसऱ्या स्थानावर आहे. तर १.५७ कोटी डॉलर कमवून बेलारुसची व्हिक्टोरिया अजारेंका चवथ्या स्थानी आहे.
टेनिस व्यतिरिक्त शारापोव्हानं २०१२मध्ये मिठाईचा व्यवसाय सुरू केला. शिवाय आता ती फॅशन आणि सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तूंचा व्यवसाय करण्याच्या विचारात असल्याचं समजतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.