www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांना ‘भारतरत्न पुरस्कार’ देण्याची शिफारस सरकारने दिली आहे. क्रीडा आणि युवा खात्याचे मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सोमवारी लिखित उत्तरात ही माहिती दिली. असे प्रथमच झाले आहे की एखाद्या खेळाडूचे नाव भारत रत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारासाठी पाठविण्यात आले आहे.
क्रीडा क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल दिवंगत मेजर ध्यानचंद यांचे नाव ‘भारतरत्न पुरस्कारा’साठी पाठविण्यात आले असल्याचे सिंह यांनी सांगितले.
मेजर ध्यानचंद यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये ४०० पेक्षा अधिक गोल केले आहेत. त्याच्या कारकिर्दीत भारताने १९२८, १९३२ आणि १९३६मधील ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकले आहे.
यापूर्वी सचिन तेंडुलकरच्या नावाचाही विचार करण्यात आला होता. परंतु, ध्यानचंद यांच्या नावाने आघाडी घेऊन सचिनला मागे टाकले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.