www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुण्यामध्ये एकाच कंपनीतील चार कर्मचारी एकाचवेळी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. चांदणी चौकातील एका अॅड एजंसीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कामाला असलेले चौघेही गेल्या १ नोव्हेंबरपासून बेपत्ता आहेत. हे सर्वजण २८ ते ३० वयोगटातील असून, त्यामध्ये एका तरूणीचाही समावेश आहे.
प्रणव लेले, चिंतन बुच, साहिल कुरेशी अशी अन्य तिघांची नावं आहेत. मागील १ तारखेला रात्री हे चौघं कोल्हापूरला जाण्यासाठी निघाले. कोल्हापूरला सहकारी तरुणीला सोडून ते गोव्याला जाणार होते. रात्री २च्या सुमारास त्यांनी पुणे-बेंगळुरू महामार्गावरील खेड- शिवापूर टोल नाका क्रॉस केला. त्यानंतर मात्र या चौघांचा कुठलाही ठावठिकाणा लागत नाहीए.
या चौघांचे मोबाईल फोन देखील लागत नाहीत. या प्रकरणी कोथरूड पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाली आहे. या चौघांकडे सिल्वर रंगाची आय-२० कार होती. तरुणी मुळची कोल्हापूर, तर एक तरूण इंदूरचा राहणार आहे. हे चौघंही सध्या पुण्यात वास्तव्याला होते. या चौघांबद्दल काही माहिती मिळाल्यास ९८२३८५८८३६ या क्रमांकावर संपर्क साधा, असं आवाहन पोलिसांनी केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.