`दुनियादारी`च्या प्रेक्षकांना जबरदस्तीने `चेन्नई` प्रवास !

‘चेन्नई एक्सप्रेस’ विरुद्ध ‘दुनियादारी’ असा वाद पुण्यातही पाहायला मिळाला. ‘दुनियादारी’ सिनेमाचं तिकिट काढूनही प्रेक्षकांना जबरदस्तीने ‘चेन्नई एक्सप्रेस’ पाहायला भाग पाडण्यात आलं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 11, 2013, 08:06 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
‘चेन्नई एक्सप्रेस’ विरुद्ध ‘दुनियादारी’ असा वाद पुण्यातही पाहायला मिळाला. ‘दुनियादारी’ सिनेमाचं तिकिट काढूनही प्रेक्षकांना जबरदस्तीने ‘चेन्नई एक्सप्रेस’ पाहायला भाग पाडण्यात आलं.
पुण्यातील ई-स्वेअर या मल्टीप्लेक्स मध्ये काल दुपारी साडेबारा वाजता ‘दुनियादारी’चा शो होता या शोचं एडव्हान्स बुकिंग करून आलेल्या प्रेक्षकांना मात्र जबरदस्तीनं ‘चेन्नई एक्सप्रेस’ बघायला भाग पाडल्यामुळे प्रेक्षक संतप्त झाले. प्रेक्षकंनी पाठपुरावा केल्यावर तांत्रिक बिघाडामुळे बराच वेळ पर्यंत शो रद्द झाल्याच सांगत ‘दुनियादारी’ सुरु होईपर्यंत ‘चेन्नई एक्सप्रेस’ पहायचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे चिडलेल्या प्रेक्षकांनी पैसे परत द्या नाहीतर चित्रपट दाखवा असा पवित्रा घेतला.
कॅमेरामन संजय जाधव यांच्या `दुनियादारी` या मराठी सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळतोय. ‘चेन्नई एक्सप्रेस’ सिनेमासाठी सिंगल स्क्रीन थिएटरमधून दुनियादारी सिनेमा काढण्याचा प्रयत्न होताच मराठीचा मुद्दा हाती घेत मनसेने दुनियादारी सिंगलफेज थिएटरवरून काढला जाऊ नये, असा इशारा थिएटर मालकांना दिला होता. मात्र मल्टिप्लेक्समध्ये मराठी सिनेमावर अशा रीतीने अन्याय झाल्याचं दिसून येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.