www.24taas.com, पुणे
मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना पुन्हा एकदा मोठा धक्का दिलाय. राज्य सरकारनं पुणे महापालिकेला विश्वासात न घेता महापालिकेची हद्द वाढवली आहे. राज्य सरकारनं परस्पर २८ गावांचा समावेश महापालिका हद्दीत केलाय.
११ ऑक्टोबरला राज्य सरकारनं त्यासंदर्भातला अध्यादेश प्रसिद्ध केलाय. पुणे महापालिकेला यासंदर्भात अंधारात ठेवण्यात आलं होतं. या निर्णयामुळे २८ गावं पुणे महापालिकेत समाविष्ट होणार आहेत. त्यामुळे दहा लाखांनी पुण्याची लोकसंख्या वाढणार आहे. तसंच ११० चौरस किलोमीटरनं क्षेत्रफळही वाढणार आहे. विशेष म्हणजे पुणे महापालिका त्यामुळे आकारानं मुंबईपेक्षा मोठी होणार आहे. तसंच या गावांना पाणी आणि मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी महापालिकेवर ताण पडणार आहे.
या निर्णयानं मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांवर कुरघोडी केली आहे. अजित पवारांनी राजीनामा देताच हा निर्णय घेण्यात आलाय. MMRDA च्या धर्तीवर PMRDA ची स्थापना प्रलंबित आहे. PMRDA चे अध्यक्ष कोण होणार, यावरुन वाद आहे, तो टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याची शक्यता आहे.