www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
रोजच्या व्यवहारात आपण नोटांचा वापर करतो. नोट घेतांना फारसं लक्ष देत नाही. पण त्यामुळं तुम्हाला तुमच्या कष्टाच्या कमाईवर पाणी सोडण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याचं कारण आहे बनावट नोटा..
कोल्हापूरात बनावट नोटांचा सुळसुळाट झाला असून राजारामपूरी परिसरात राहणा-या डॉक्टर प्रिया उपाध्ये यांना त्याचा फटका बसलाय...एका पेशंटकडून त्यांना ही पाचशे रुपयांची बनावट नोट मिळाली... पण जेव्हा डॉ, प्रिया उपाध्ये ही नोट बँकेत जमा करण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांना ही नोट बनावट असल्याचं समजलं..
रोजच्या व्यवहारात एखादी बनावट नोट मिळाल्यास लोक त्याची कुठे वाच्यता करत नाहीत..पोलिसांचा ससेमीर मागे लागू नये म्हणून लोक गप्प राहणं पसंत करतात. मात्र डॉ. उपाध्ये यांनी बनावट नोटांच्या विरोधात आवाज उठवण्याचं धाडस केलंय..चलनात काही बनावट नोटा येत असून लोकांनी नोटा घेतांना त्या पारखून घेण्याची सूचना बँक अधिका-यांनी केलीय.
नोटेची सत्यता ओळखण्याचे आठ फिचर्स असून त्यामध्यमातून सर्वसामान्य तुम्हीही बनावट नोट सहज ओळखू शकता..तेव्हा यापूढे दुस-या व्यक्तीकडून नोट घेण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून पहात...अन्यथा तुमची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही..
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.