www.24taas.com, सोलापूर
दुष्काळामुळे बळीराजाची उरलीसुरलेली पिकंही करपून जात आहेत. मात्र सोलापुरातल्या एका शेतक-यानं यावर एक नामी शक्कल शोधून काढली आहे.
सोलापुरातल्या 11 तालुक्यात दुष्काळाची अशी भीषण दाहकता आहे. शेतक-यांनी तर गावातून कधीच छावणीवर आसरा घेतला आहे. मात्र सोलापुरातला सुरेश साठे या शेतकऱ्यानं आपल्या शेतात असलेल्या थोड्याबहूत पाण्याचं योग्य नियोजन करून निंबोणीची बाग जपण्याचा प्रयत्न केला. ड्रिपसाठी खर्च करण्यासाठी पैसे नसल्यानं त्यानं चक्क सलाईनच्या बाटल्यांचा वापर करून आपल्या शेतातली शंभर निबोनीची रोपं जगवली.
त्यानं केलेल्या या अभिनव प्रयोगाला दुष्काळग्रस्त शेतक-यांनी चांगलीच दाद दिली आहे. सुरेश साठे या शेतक-याप्रमाणं अभिनव पद्धतीनं रोपं जगवली तर दुष्काळातही पालवी फुलवण्यास मदत होऊ शकते.