www.24taas.com,कोल्हापूर
कोल्हापुरात आयआरबी कंपनीच्यावतीने उभारण्यात आलेले टोलनाके अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिल्याची घटना घडलीय. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलीय.
शहरातल्या शाहू नाका, शिये नाका आणि फुलेवाडी नाका इथल्या टोलनाक्यांना पेटवण्यात आलंय. कोल्हापुरात गेल्या तीन वर्षांपासून टोलला विरोध करण्यासाठी वेगवेगळी आंदोलनं सुरु आहेत. याची जबाबदारी शिवसेनेने स्वीकारली आहे. आमदार क्षीरसागर यांनी ही जबाबदारी स्वीकाली.
मात्र राज्य सरकारनं टोलबाबत कोणतीही भूमिका घेतली नसल्याचा कोल्हापूरकरांचा आरोप आहे. टोलनाके पेटवून देण्याची ही दोन वर्षातली दुसरी घटना आहे.
कोल्हापुरातल्या अंतर्गत रस्त्यांवरील टोलनाक्यांना सुरुवातीपासूनच विरोध होतोय. आतापर्यंत टोल विरोधात अनेक आंदोलनं झालीये. कोल्हापुरातली शाळकरी मुलंही टोलविरोधात रस्त्यावर उतरली होती.
कोल्हापुरातल्या नागरिकांनी जोडेमारो आंदोलन केलं होतं. त्यानंतर महिलांनीही करवीर निवासीनी महालक्ष्मीला अभिषेक घातला होता. कोल्हापूरकरांच्या मानगुटीवर बसलेलं टोलचं भूत उतरावं अशी मागणी यापूर्वी अनेकवेळा झालीये.