www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुणे महापालिकेतल्या विरोधी पक्षनेतेपदाचा वाद आता हायकोर्टात गेलाय. मनसेनं यासंदर्भात हायकोर्टात जनहित याचिका दाखल केलीय. काँग्रेसचं विरोधी पक्षनेते पद काढून घ्यावं, अशी मनसेची मागणी आहे.
पुणे महापालिकेच्या सभागृहात सध्या सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही भूमिका काँग्रेस पार पडतंय. मनसेकडे असलेलं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे आलं. मात्र, सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही भूमिका एकाच वेळी काँग्रेस कशा पूर्ण करू शकतो... असा मनसेचा सवाल आहे. त्याचसाठी मनसेनं कोर्टात धाव घेतलीय.
तर मनसेची याचिका म्हणजे वेळकाढूपणा आहे, अशी टीका काँग्रेसनं केलीय. हायकोर्टात पुढच्या महिन्यात मनसेच्या जनहित याचिकेवर सुनावणी होणार आहे. तेव्हाच, पुणे महापालिकेतलं विरोधी पक्षनेते पद कोणाकडे जातं, हे स्पष्ट होईल...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.