www.24taas.com,सातारा
साताऱ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना राडा केल्याने येथील वातावरण तापले आहे. साताऱ्यातल्या सैनिकी शाळेत प्रवेश प्रक्रियेवरुन गोंधळ झालाय. उत्तरप्रदेश आणि बिहारच्या विद्यार्थ्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. आज दुपारी ही घटना घडली.
मनसैनिकांनी परप्रांतीय विद्यार्थी आणि पालकांना सैनिकी शाळेतून हाकलण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळं या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालयं. वयाचे खोटे दाखले सादर करुन परप्रांतियांचा प्रवेश देण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यामुळं आलेल्या विद्यार्थ्यांचं वय निश्चित करण्यासाठी वैद्यकीय चाचणी करावी आणि नंतरच प्रवेश द्यावा, अशी मागणी मनसे कार्यकर्त्यांनी केलीये.
ग्रामीण भागातील मराठी मुलांसाना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने साताऱ्यात ही सैनिकी शाळा सुरू करण्यात आली आहे. मात्र, शाळेतील भरतीमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारी युवकांना प्राधान्य देण्यात येत होते. प्रवेश घेताना वयाचे खोटे दाखले दिल्याचा आरोप मनसेनेने केलाय. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे.
खोटे दाखले देऊन प्रवेश घेणाऱ्यांना त्तर प्रदेश आणि बिहारी युवकांना मनसेने हाकलून दिले. मराठी मुलांवर अन्याय होत असल्याने त्यांना हाकले असल्याची भूमिका मनसेने घेतलीय.