www.24taas.com, झी मीडिया
संरक्षित स्मारकाच्या १०० मीटर परिसरात कोणतही बांधकाम करण्यास मनाई आहे. त्यामुळे पुण्यातल्या स गो बर्वे चौकातल्या ग्रेड सेपरेटरच्या कामाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिलीय.
या निर्णयामुळे शिवाजीनगर परिसरातल्या वाहतुकीच्या समस्येसोबतच मेट्रो प्रकल्पाच्या भवितव्याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. पुण्यात जंगली महाराज रस्त्यावरचं पाताळेश्वर मंदिर हे राष्ट्रीय संरक्षित स्मारक आहे. त्यापासून ५२ मीटर अंतरावर ग्रेड सेपरेटरचं काम सुरू आहे. २० कोटींच्या खर्चाचं हे काम २५ टक्के पूर्ण झालंय. याचिका दाखल झाल्यावर उच्च न्यायालयाने या कामाला स्थगिती दिलीय.
या निर्णयाचा फटका मेट्रोल रेल्वेलाही बसण्याची शक्यता आहे. मेट्रोच्या आराखड्यानुसार शहरातल्या शनिवार वाडा तसंच नगर रस्त्यावरच्या आगाखान परिसरातून मेट्रोचा मार्ग जाणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.