पुण्यात आता हे नवं काय?, चक्क मृत महिलेला जिवंत दाखवून पैसे लाटलेत

पुण्यातील एक धक्कादायक बातमी..... एका मृत महिलेला जिवंत दाखवून तिच्या वैद्यकीय उपचारासाठी एक लाख रुपये मंजूर केल्याचा प्रताप पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलाय. प्रत्यक्षात एनआरआय असलेल्या राजलक्ष्मी बालसुब्रमण्यम या महिलेला त्यांच्या मृत्यूनंतर चक्क झोपडपट्टी रहिवासी दाखवण्यात आलंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 24, 2013, 09:25 AM IST

www.24taas.com, झी मीडिया,पुणे
पुण्यातील एक धक्कादायक बातमी..... एका मृत महिलेला जिवंत दाखवून तिच्या वैद्यकीय उपचारासाठी एक लाख रुपये मंजूर केल्याचा प्रताप पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलाय. प्रत्यक्षात एनआरआय असलेल्या राजलक्ष्मी बालसुब्रमण्यम या महिलेला त्यांच्या मृत्यूनंतर चक्क झोपडपट्टी रहिवासी दाखवण्यात आलंय.
हे मृत्यू प्रमाणपत्र राजलक्ष्मी बालसुब्रनियम या महिलेचं आहे. जर्मनी मध्ये स्थायिक झालेल्या मात्र काही कारणास्तव भारतात आलेल्या राजलक्ष्मी यांचा १२ जुलै २०११ रोजी पुण्यात मृत्यू झाला. राजलक्ष्मी यांचा पत्ता आणि मृत्यूची तारीख जरा नीट पहा… आता जरा पुणे महापालिकेनं दिलेल्या या पत्रावर नजर टाका. महापालिकेच्या उप आरोग्य प्रमुखांनी दिनांक १३ जुलै २०११ रोजी म्हणजे राजलक्ष्मी यांच्या मृत्युनंतर दुसऱ्या दिवशी कमला नेहरू रुग्णालयाला लिहिलेलं हे पत्र आहे.
राजलक्ष्मी बालसुब्रनियम या झोपडपट्टीत राहत असून त्या महापालिकेच्या वैद्यकीय सहाय्य योजनेच्या सभासद असल्याचं त्यात नमूद करण्यात आलय. इतकच नाही तर या योजनेअंतर्गत त्यांना महापालिकेकडून एक लाख रुपयांची वैद्यकीय मदत मंजूर करण्यात आलीय. महापालिकेच्या वैद्यकीय सहाय्य योजनेचा निधी गैर मार्गाने लाटण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते रवी बराटे यांनी केलाय.
राजलक्ष्मी सुब्रमनियम यांच्या नावाच बनावट रेशन कार्ड, बनावट बीपीएल कार्ड तसेच इतर आवश्यक कागदपत्रे या प्रकरणासोबत जोडण्यात आली आहेत. त्यामध्ये काहीतरी घोटाळा असल्याची शंका येताच हा वैद्यकीय सहाय्य निधी सम्बन्धित रुग्णालयाला वर्ग करण्याची प्रक्रिया थांबवण्यात आल्याचं स्पष्टीकरण आरोग्य विभागान दिलय.
फक्त पैसे देण्याचं थांबवलं म्हणून हे प्रकरण मिटत नाही. मृताच्या टाळूवरचं लोणी खाणारी अशी मोठी यंत्रणाच महापालिकेमध्ये कार्यरत असण्याची शक्यता आहे. या टोळीनं किती मृतांना जिवंत केलं असेल, तेही सांगणं अशक्य आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.