एंड्युरो स्पर्धेचं उद्घाटन राज ठाकरेंच्या हस्ते

उद्या पुण्यामध्ये एंड्युरो स्पर्धा सुरू होत असून त्यात देशभरातले स्पर्धक सहभागी होत आहेत. या स्पर्धेचं उद्घाटन मनसे प्रमुख राज ठाकरे करणार आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 9, 2013, 12:02 AM IST

www.24taas.com, पुणे
उद्या पुण्यामध्ये एंड्युरो स्पर्धा सुरू होत असून त्यात देशभरातले स्पर्धक सहभागी होत आहेत. या स्पर्धेचं उद्घाटन मनसे प्रमुख राज ठाकरे करणार आहेत.
पुण्यात होणाऱ्या एंड्युरो स्पर्धेत सायकलिंग, रॅपलिंगसारख्या स्पर्धा होतात. ऍडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये समाविष्ट असणाऱ्या या खेळांची ही स्पर्धा आहे. यंदाचं वर्ष हे या स्पर्धेचं नववं वर्ष आहे. या स्पर्धेचं उद्घाटन करायला मनसे प्रमुख राज ठाकरे येणार आहेत.