www.24taas.com, झी मीडिया, पुणे
गेल्या महिन्यात सोन्याचे भाव कमी झाल्यामुळे जनता खुश झाली होती. तसंच पेट्रोलचे भावही कमी झाल्याचंही समाधानही जनतेला मिळालं होतं. मात्र दुष्काळामुळे आता दुधाचे दर वाढणार आहेत.
दुधाचे दर पुन्हा भडकण्याची शक्यता आहे. सहकारी आणि खासगी दूध संघांच्या प्रतिनिधींची आज पुण्यात बैठक झाली. यात म्हशीचं दूध ५ रुपयांनी तर गायीच्या दूधाचा दर ३ रुपयांनी वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.
दुष्काळामुळे शेतक-यांना दुध हेच एकमेव उत्पन्नाचे साधन राहिले आहे. तसंच सध्या चा-याचे दरही मोठ्या प्रमाणात वाढलेत. त्यामुळे दूध दर वाढीशिवाय पर्याय नाही, असा दावा दूध उत्पादकांनी केलाय.