www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पिंपरी चिंचवड जवळील चाकण इथल्या बजाज ऑटो प्लांट मधल्या कामगारांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बंदचा आज चाळीसावा दिवस आहे. कामगार आणि बजाज प्रशासन दोन्हीही आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामूळं यातून अजूनही तोडगा निघालेला नाही. आणखी किती ही दिवस बंद सुरु राहिला तरी मागे हटणार नसल्याच कामगारांनी स्पष्ट केलंय. तर दूसरीकडे कामगार काम सुरू करत नाहीत तो पर्यंत मागण्यांबाबत चर्चा होणार नाही अस बजाज प्रशासनान स्पष्ट केलंय. त्यामुळ हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे
बजाज प्रशासन आणि कामगार यांच्यातला वाद शमण्याची चिन्ह दिसत नाही..आज चाळीस दिवस उलटून गेले तरी वाद मिटण्याची चिन्ह दिसत नाहीत. बदली झालेल्या कामगारांना परत बोलावण, निलंबित कामगारांना परत रुजू करून घेण आणि पगार वाढ अशा विविध मागण्यांसाठी कामगारांनी बजाज कंपनीच्या चाकण प्लांट मधील कामगारांनी २५ जून पासून काम बंद आदोलन सुरु केलंय, पण कामगारांच्या मागण्यांकड बजाज प्रशासनान अजून ही लक्ष दिलेलं नाही. कामगारांच्या मागण्यांकड दुर्लक्ष करत प्रशासनान चाकण मधला प्रकल्प बंद केलाय. त्यामुळं या ठिकाणी होणार पल्सर गाड्यांच उत्पादन बंद आहे. बजाज प्रशासन लक्ष देत नसलं तरी आम्ही आंदोलनावर ठाम असल्याच कामगार संघटनेचे प्रमुख दिलीप पवार यांनी स्पष्ट केलंय.
कामगारांनीही कितीही दिवस काम बंद राहील आणि पगार मिळाला नाही तरी आंदोलनातून माघे हटणार नसल्याच कामगार सांगतायेत. दूसरीकडं बजाज प्रशासनानही जो पर्यंत कामगार काम सुरु करत नाहीत तो पर्यंत मागण्यांवर चर्चा नाही अस स्पष्ट केलंय. हा वाद सध्या कामगार आयुक्तांकड गेलाय. पण दोन्ही बाजू भूमिकांवर ठाम असल्यानं अजून ही तोडगा निघताना दिसत नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.