www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
राज्यातील इतर शहराप्रमाणं कोल्हापूर शहराचा पाराही चांगलाच वाढलाय. कोल्हापूरचा पारा 40 अंशावर पोहचला आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी पाऊस पडत असल्याने उकाड्यात वाढ झालेय. कोकण, सांगली-मिरज येथे तुरळक पाऊस झाला.
कोल्हापूर शहरातील तापमान इतर शहरांच्या तुलनेनं कमी असते. पण यंदा मात्र वेगळी परिस्थिती दिसुन येतेय. आठ दिवसापूर्वी कोल्हापूरचे तापमान 35 ते 36 अंशावर होता. पण आता हे तापमान वाढून 40 डिग्रीवर पोहचले आहे. नेहमी पंख्याचा वापर करणारे कोल्हापूरकर आता ए.सी आणि कुलरची खरेदी मोठ्या प्रमाणात करताना दिसतायत.
वृक्षतोड, वाढलेलं प्रदूषण यामुळं कोल्हापूरच्या वातावरणातही चांगलाच बदल होत चालला आहे..त्यामुळं अनेकजण दुपारच्यावेळी बागेत विसावा घेणं पसंत करतायत. त्यातच आधुन मधुन विज गुल होत असल्यामुळं अनेक विद्यार्थी बागेत येवुन अभ्यास करताना दिसतायत. दुपारी शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.