तुकोबांच्या पालखीनं ठेवलं आज प्रस्थान!

जगदगुरु तुकाराम महाराजांच्या पालखीने आज आषाढी वारीसाठी देहूहून प्रस्थान ठेवलं. आज सकाळपासूनच मंदिर परिसरात वारकऱ्यांनी जय जय रामकृ्ष्ण हरी च्या गजरात वातावरण भक्तिमय झाले होते.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 19, 2014, 06:08 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
जगदगुरु तुकाराम महाराजांच्या पालखीने आज आषाढी वारीसाठी देहूहून प्रस्थान ठेवलं. आज सकाळपासूनच मंदिर परिसरात वारकऱ्यांनी जय जय रामकृ्ष्ण हरी च्या गजरात वातावरण भक्तिमय झाले होते.
सकाळी वारकऱ्यांनी इंद्रायणीत स्नान करुन तुकाराम महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. दुपारपासून वारकऱ्यांच्या दिंड्यानी मंदिर परीसर दुमदुमून गेला होता. संध्याकाळी साडेचारच्या सुमारास तुकाराम महाराजांची पालखी वारकऱ्याच्या नजरेस पडली आणि टाळ मृदुगांसाह ग्यानबा तुकारामचा गजर आसमंतात भिडला.
आज तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम इनामदार वाड्यात असेल. तर उद्या सकाळी अनगडशहा बाबा आणि चिंचोली पादूका मंदिरात अंभग आरती झाल्यावर निगडी मार्गे आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात मुक्काम असेल
कसा असेल तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रवास... जाणून घ्या...

.