www.24taas.com, मुंबई
राज्याच्या राजकारात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा प्रभाव मोडून काढण्यासाठी शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीत मनसेला सहभागी करुन घेण्यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
या आघाडीचा पहिला टप्पा म्हणून येत्या लोकसभा निवडणुकीत मुंबईच्या सहा जागा शिवसेना-भाजप आणि मनसे यांच्यात समप्रमाणात वाटून घेण्याचा निर्णय अंतिम टप्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसैनिक आणि मनसैनिकांनी एकत्र यावं, अशी भावना व्यक्त केली जात होती. उद्धव ठाकरे यांनीही जानेवारी महिन्यात `सामना`ला दिलेल्या मुलाखतीमधून राज ठाकरेंना अप्रत्यक्ष साद घातली होती. त्यावर राज यांनी अशा चर्चा वृत्तपत्रात होत नसतात, असं सांगत यावर जाहीर मत व्यक्त करण्यास नकार दिला होता. मात्र, हा प्रस्ताव फेटाळलाही नव्हता.
संभाव्य महायुतीत मनसेच्या समावेशास रामदास आठवले यांचा विरोध असला तरी त्यांचीही समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.