राज ठाकरेंवरील हल्ल्यामुळे राज्यभऱात ‘खळ्ळ् खट्याक’!

अहमदनगरच्या भिंगार गावाजवळ राज यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली.. ही दगडफेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप मनसेनं केलाय... या दगडफेकीचे पडसाद लगेचच राज्यभर उमटण्यास सुरुवात झालीय...

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 27, 2013, 08:49 AM IST

www.24taas.com, मुंबई
अहमदनगरच्या भिंगार गावाजवळ राज यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली.. ही दगडफेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप मनसेनं केलाय... या दगडफेकीचे पडसाद लगेचच राज्यभर उमटण्यास सुरुवात झालीय... मुंबई, ठाणे आणि पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयांना टार्गेट करण्यात आलंय...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात गेल्या काही दिवसांपासून चांगलीच तू-तू-मैं-मैं रंगलीय.. मात्र हेच वाकयुद्ध आता संघर्ष रुपात रस्त्यावर पाहायला मिळतोय... अहमदनगरच्या भिंगार गावाजवळ राज यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली.. ही दगडफेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप मनसेनं केलाय... त्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला.. या दगडफेकीचे पडसाद लगेचच राज्यभर उमटण्यास सुरुवात झालीय.. मुंबईतल्या दादर,माहीम,वांद्रे सायन कोळीवाडा, गोरेगाव, ठाणे, पुणे शहर, लातूर शहर, परभणीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केलाय... तर बुलडाण्यात एसटीची तोडफोड करण्यात आलीय...
राज ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक
राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांवर दगडफेक करण्यात आलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केल्याचा आरोप मनसेनं केलाय. अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार गावातील ही घटना आहे. सध्या राज ठाकरे यांचा राज्याचा दौरा सुरु आहे.. या अंतर्गत भगवानगड इथून राज अहमदनगरकडे येत असताना हा प्रकार घडला.. गेल्या काही दिवसांपासून राज आणि अजित पवार यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे.. या पार्श्वभूमीवर राज यांचा काळे झेंडे दाखवून निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिंगार गावाजवळ मोठ्या संख्येने जमले होते असं सांगण्यात येतंय.. त्यानंतर राज यांचा ताफा येताच या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आलाय.. दरम्यान या घटनेनंतर मनसैनिक आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते आमनेसामने आल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं..दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना हटवण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागलाय...
...............
राष्ट्रवादीने लोकशाही मार्गाने निषेध करावा
मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी राज यांच्या ताफ्यावरील हल्लाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केलेत... विरोध करायचा असल्यास लोकशाही मार्गाने करा अन्यथा समोर येऊन हल्ले करा असं आव्हान त्यांनी राष्ट्रवादीला दिलंय... शिवाय अहमदनगरच्या पोलीस अधीक्षक करतात काय असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय...
.................
राष्ट्रवादीने आरोप फेटाळले
दुसरीकडे मनसेचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी किरण काळे यांनी फेटाळलेत... राष्ट्रवादी काँग्रेसने नगरमध्ये शांततेने आंदोलन केल्याचा दावा त्यांनी केलाय.. तसंच मनसेकडूनच गाडीतून दगड आणण्यात आल्याचा आरोपही काळे यांनी केलाय...
..............

मुंबईतही राष्ट्रवादीचे कार्यालये टार्गेट
अहमदनगरमध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यावरील दगडफेकीचे पडसाद मुंबईतही उमटले... मनसे आमदार राम कदम आणि मनसैनिकांनी मुंबईत ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफिसला टार्गेट केलं...राष्ट्रवादी काँग्रेसचं मुंबईतलं मुख्यालय, दादर, माहीम, वांद्रे, सायन कोळीवाडा, गोरेगाव परिसरातल्या ऑफिसची तोडफोड करण्यात आली... शिवाय राष्ट्रवादीच्या होर्डिंग्सलाही लक्ष्य करण्यात आलंय.. दुसरीकडे मनसे आमदार राम कदम यांनी आपल्या समर्थकांसह खारच्या लिकिंग रोड इथं अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला काळं फासलं. शिवाय राज यांच्या ताफ्यावरील दगडफेकीचा निषेध करण्यासाठी जाळपोळही केली... यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली... राज यांच्या ताफ्यावरील दगडफेक प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा राम कदम यांनी दिलाय..
..................
अहमदनगरमध्येही पडसाद
राज ठाकरे यांच्या ताफ्यावर अहमदनगर झालेल्या हल्ल्याचे पडसाद ठाण्यातही उमटलेत... 25 ते 30 अज्ञात व्यक्तींनी पाचपाखाडीतल्या राष्ट्रवादीच्या ऑफिसची तोडफोड केलीय.. मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडलीय.. याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी 25 ते