www.24taas.com, मुंबई
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा सचिन तेंडुलकरने रविवारी वन डेमधून निवृत्ती पत्करली. १९८९ सालापासून सुरू झालेला प्रवास अखेरीस संपुष्टात आला (अर्थात कसोटीत तो खेळत राहणार हा भाग वेगळा). पण वन डेत तरी सचिन नावाचे वादळ आता घोंघावताना दिसणार नाही. त्यामुळे वन डे क्रिकेटमधील त्याच्या महत्त्वाच्या खेळी....
भारत-वेस्ट इंडीज, पर्थ, १९९१
ऑस्ट्रेलियातील तिरंगी वन डे मालिकेतील या दोन देशांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. ‘लो स्कोअरिंग गेम’ म्हणून ही लढत ओळखली गेली. भारतचा संघ १२६ धावांवर बाद झाल्यानंतर भारतच्या गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करीत विंडीजचीही भंबेरी उडवली. या लढतीत मोहम्मद अझरुद्दीनने महत्त्वाचे षटक टाकण्यासाठी सचिनच्या हाती चेंडू सोपवला. त्याने ऍण्डरसन कमिन्सला बाद करीत लढत बरोबरीत रोखली. लहान वयामध्ये सचिनने त्यावेळी केलेली कामगिरी ‘काबिल-ए-तारीफ’ ठरली होती.
भारत-दक्षिण आफ्रिका, हीरो कप, उपांत्य फेरी, १९९४
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामधील हीरो कपमध्ये झालेली उपांत्य लढत रोमहर्षक झाली. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या लढतीत सचिनच्या अचूक टप्प्यातील गोलंदाजीमुळे भारतने प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. यानंतर वेस्ट इंडीजला हरवून हीरो करंडकही पटकावला. सचिनने अखेरच्या षटकात फक्त ३ धावा देत भारतला २ धावांनी सनसनाटी विजय मिळवून दिला.
भारत-न्यूझीलंड, ऑकलंड, १९९४
या लढतीत सचिनला पहिल्यांदाच सलामीला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. न्यूझीलंडच्या १४३ धावांचा पाठलाग करणार्याघ भारतने अवघ्या २३.२ षटकांत विजयी लक्ष्य ओलांडले. या लढतीत सचिनने ४९ चेंडूंत २ षटकार व १५ चौकारांची बरसात करीत ८२ धावा तडकावल्या. येथूनच सुरू झाला त्याचा सलामी म्हणून यशस्वी होण्याचा ‘नॉनस्टॉप’ प्रवास.
भारत-श्रीलंका, वर्ल्ड कप, उपांत्य फेरी, कोलकाता १९९६
या वर्ल्ड कपमध्ये सचिनने सर्वाधिक ५२३ धावा तडकावल्या. त्याच्यामुळेच भारतने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. मात्र कोलकाता येथे झालेल्या उपांत्य लढतीत श्रीलंकेला विजयी घोषित करण्यात आले. श्रीलंकेच्या २५२ धावांचा पाठलाग करणार्याक भारतची अवस्था ८ बाद १२० अशी झाली असताना प्रेक्षकांनी आपला रंग दाखवला. त्यामुळे तेथेच थांबविण्यात आलेल्या या सामन्यात लंकेला विजयी घोषित करण्यात आले. पण इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरीत असताना सचिनने झळकावलेल्या ६५ धावा अत्यंत मोलाच्या ठरल्या.
भारत-दक्षिण आफ्रिका, ग्वाल्हेर, २४ फेब्रुवारी २०१०या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासात सचिनने नाव सुवर्णाक्षराने अधोरेखित केले गेले. याच दिवशी त्याने नाबाद २०० धावांची खेळी साकारली. वन डे क्रिकेटमध्ये एका डावात २०० धावा करणारा तो पृथ्वीतलावरील पहिलाच क्रिकेटपटू ठरला.
भारत-ऑस्ट्रेलिया, शारजा, १९९८
सचिनने १९९८ साली धावांचा पाऊस पाडला. याच वर्षी शारजामध्ये त्याने झळकावलेल्या दोन खेळी अजरामर झाल्या. महत्त्वाचे म्हणजे या दोन्ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध होत्या. दोन्ही वेळा धावांचा पाठलाग करताना त्याने संस्मरणीय शतक झळकावले हे विशेष. १३४ व १४३ धावा त्याने मैदानात वाळूचे वादळ आल्यानंतर ठोकल्या.
भारत-केनिया, वर्ल्ड कप, १९९९
केनियाविरुद्ध खेळताना सचिनने या लढतीत नाबाद १४० धावा तडकावल्या. ही खेळी केनियासारख्या दुबळ्या संघाविरुद्ध केली असल्यामुळे तिला इतके महत्त्व का द्यावे असा प्रश्न् यावेळी उभा राहतो. पण वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्याने लगेचच मैदानात येऊन ही खेळी साकारली होती. त्यामध्ये भावना होत्या. ‘इमोशनल’दृष्ट्या त्या खेळीला प्रचंड ‘व्हॅल्यू’ आहे. या लढतीत भारतने मोठा विजय मिळवला हे विशेष.
भारत-पाकिस्तान, वर्ल्ड कप, २००३
कोणत्याही लढतीत पाकिस्तानला चिरडले म्हणजे तमाम भारतवासीयांसाठी दिवाळी साजरी करण्यासारखीच. सचिनने या वर्ल्ड कपमध्ये त्याचा आस्वाद घेण्याची संधी तमाम क्रिकेटप्रेमींना दिली. वासीम अक्रम, व