www.24taas.com,झी मीडिया,नवी दिल्ली
अभिनेता संजय दत्तनं येरवडा जेलमध्ये शरण येण्याची परवानगी मिळावी यासाठी टाडा कोर्टात याचिका दाखल केलीय. संजय दत्तची मागणी मान्य करणे शक्य आहे का, याबाबत टाडा कोर्टाने सीबीआयला निर्देश दिले आहेत. तसंच उद्यापर्यंतच म्हणणं मांडण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत.
संजय दत्तला मुदतवाढ मिळावी यासाठी संजयच्या आगामी चित्रपटांच्या निर्मात्यानी सर्वोच्च न्यायालयात मुदतवाढ याचिका दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावलीय. त्यामुळे संजय दत्तला दिलेल्या मुदतीतंच शरणागती पत्करावी लागणार आहे.
संजय दत्त याला न्यायालयात शरण येण्यासाठी मुदतवाढ देण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला असून, संजय दत्तने पुण्यातील येरवडा कारागृहामध्ये शरण येण्यासाठी टाडा न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे. १६ मेला संजूबाबाला शरणागती पत्करावी लागण्याचीच शक्यता आहे. त्यामुळे संजूबाबाची तुरुंगवारी आता पक्की आहे.
१९९३ बॉम्बस्फोट खटल्यात पाच वर्षांची शिक्षा झालेल्या संजय दत्तची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली. त्यामुळे १६ तारखेला संजय दत्तला तुरुंगाची वारी करावीच लागणार आहे. असं असलं तरी त्याच्यासमोर काही पर्याय अजूनही आहेत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.