www.24taas.com, झी मीडिया
वादविवाद आणि खूपसारा धिंगाणा हा रिअॅलिटी शो चा एक अनिर्वाय भाग झाला आहे. सध्या चर्चेत असणारा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस ७’ पर्व अशाच काही कारणांमुळे गाजतंय, या पर्वातील स्पर्धक अत्यंत वादग्रस्त आहेत. त्यामुळे शोला चांगलाच टिआरपी मिळत आहे. कॅमेऱ्यांसमोर वावरताना जो तो आपली प्रतिभा कशी उत्कृष्ट ठरेल याच प्रयत्नात असतो.
चौथ्यांदा बिग बॉस शोचं निवेदन करणाऱ्या दबंग सलमान खानने नुकतेच ट्विट केले की, शोच्या स्वरूपानुसार प्रत्येक आठवड्यातील गेम्स हे अधिक मजेशीर आणि वाद निर्माण करणारे बनत चालले आहेत, ते जिंकण्यासाठी स्पर्धकांमधील होणारे वादविवाद यासर्वांमुळे बिग बॉसचे चाहते नाराज होत आहेत, पण हा एक शो आहे. आत्मसन्मान, रागावर संयम, अहंकार, क्रोध, ड्रामा, भाषा, गेम्स, उमेदवारी, या सर्व गोष्टी दिवसेंदिवस हातळण्यास कठीण होत चालल्या आहेत आणि त्यातून शिकायलाही मिळत आहे.
नुकत्याच झालेल्या शनिवारच्या भागात अरमान आणि एजाज खान मध्ये निरर्थक वाद निर्माण झाला, तो इतका वाढत गेला की ते दोघेही एकमेकांना कमीपणा दाखवण्याच्या प्रयत्नात गुंतत गेले. एजाझने अरमानला एक फ्लॉप हिरो म्हणून संबोधलं आणि आपण स्वतः आपली ओळख निर्माण केल्याच्या बढाया मारल्या. या सर्व मसालेदार ड्राम्याने बिग बॉसचे चाहते खूश झाले.
बिग बॉस ७ पर्वाची सुरूवात चांगला प्रतिसाद आणि किरकोळ भांडणाने झाली होती परंतु आता वेळेनुसार हा एक सनसनाटी शो असल्याचं दिसलं जात आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.