मुंबई : आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या हार्दिक पांड्याने पुन्हा एकदा जबरदस्त खेळ करताना मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत बडोद्याला विजय मिळवून दिला.
वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या विदर्भविरुद्धच्या सामन्यात पांड्याने तीन चौकार आणि आठ षटकारांच्या सहाय्याने ४६ चेंडूत ८६ धावांची खेळी केली. पांड्याच्या या खेळीने बडोद्याचा विजय सुकर झाला.
विदर्भने पाच बाद १६२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल १२.५ षटकांत बडोद्याची अवस्था ४ बाद ८५ अशी झाली. यावेळी पांड्या संघाच्या मदतीला धावून आला. घरच्या मैदानावर दिमाखदार कामगिरी करताना त्याने संघासाठी विजयश्री खेचून आणली.