मुंबई : ऑस्ट्रेलियातील तिरंगी मालिकेत आणि वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया नव्या लूकमध्ये दिसणार आहे. टीम इंडियाची वनडे किट हे ३३ प्लास्टिक बाटल्यांपासून तयार करण्यात आले आहे. ३३ बाटल्यांचे रिसायकल करुन हे किट तयार करण्यात आलेय. या नवी किटमध्ये जर्सी आणि लोअर आहे.
बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया अर्थात बीसीसीआयने टीम इंडियाची नवी जर्सी लॉन्च केली आहे. बीसीसीआयने एमसीजी मैदानवर टीम इंडियाची नवी जर्सी लॉन्च केली.
BCCI in association with @NikeCricket unveil the all new Official Team #India Jersey at the MCG pic.twitter.com/MtuPZr1z3o
— BCCI (@BCCI) January 15, 2015
बीसीसीआयने त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरही टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि कंपनीसह संघाच्या नव्या जर्सीचा फोटो अपलोड केलाय.
या नव्या जर्सीच्या कॉलर आणि स्लीव्ह्जवर ऑरेंज कलरची बॉर्डर आहे, तर लोअर पॉकेटवरही ऑरेंज कलरची बॉर्डर लावण्यात आली आहे. टीम इंडियाच्या टी-शर्टवर हलक्या डॉटची डिझाइन आहे. टीम इंडियाचा टायटल स्पॉन्सर स्टार आहे. सहारानंतर भारतीय टीमची टायटल स्पॉन्सरशिप स्टारने खरेदी केलेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.