रविंद्र जडेजाच्या लग्न सोहळ्यात गोळीबार

भारताचा क्रिकेटपटू रविंद्र जडेजा लग्नाच्या बेडीत अडकला आहे. रिवा सोलंकीबरोबर जडेजाचं लग्न झालं आहे. 

Updated: Apr 17, 2016, 10:02 PM IST
रविंद्र जडेजाच्या लग्न सोहळ्यात गोळीबार

राजकोट: भारताचा क्रिकेटपटू रविंद्र जडेजा लग्नाच्या बेडीत अडकला आहे. रिवा सोलंकीबरोबर जडेजाचं लग्न झालं आहे. 

लग्न सोहळ्यावेळी वराती दरम्यान सेलिब्रेशनचा भाग म्हणून हवेत गोळीबार करण्यात आला. पण या गोळीबारामुळे नवा वाद निर्माण व्हायची शक्यता आहे. 

लग्नाच्या सेलिब्रेशनवेळी असा गोळीबार करणं योग्य आहे का, चुकुन ही गोळी कुणाला लागली असती तर केवढा अनर्थ झाला असता, त्याला जबाबदार कोण असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. 

पाहा लग्न सोहळ्यातील गोळीबार