Video धोनीने विराटच्या दिशेने स्टंप फेकला आणि...

वन डे टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी आणि कसोटी क्रिकेटचा कर्णधार विराट कोहली यांच्यातील संबंधाबाबत कटू वृत्त येत असतात. मात्र, मैदानावर असं काही दिसून येत नाही. कॅप्टन कुल धोनीने हातात स्टंप घेऊन आला आणि हा स्टंप चक्क विराटकडे फेकला.

Updated: Oct 23, 2015, 02:14 PM IST
Video धोनीने विराटच्या दिशेने स्टंप फेकला आणि... title=

चेन्नई : वन डे टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी आणि कसोटी क्रिकेटचा कर्णधार विराट कोहली यांच्यातील संबंधाबाबत कटू वृत्त येत असतात. मात्र, मैदानावर असं काही दिसून येत नाही. कॅप्टन कुल धोनीने हातात स्टंप घेऊन आला आणि हा स्टंप चक्क विराटकडे फेकला.

अधिक वाचा : विराट कोहलीने सिक्स ठोकत शतक केले आणि दाखवले बायसेप्स

मॅच संपल्यानंतर विजयी सामन्याच्या आठवणीसाठी स्टंप घेऊन जाण्याची प्रथा अनेकवेळा आपण पाहिली असेल. मात्र, चौथ्या वन-डे सामना जिंकल्यानंतर पॅव्हेलियनकडे जाणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट कोहली होता. यावेळी धोनीने त्याच्या दिशेने स्टंप फेकला.

या मालिकेत टीम इंडिया १-२ ने मागे होती. त्यामुळे या मालिकेत आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय आवश्यक होता. विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गुरुवारी शानदार शतक करत टीम इंडीयाला मजबुत स्थिती ठेवले. विराटची ही शतकी खेळी महत्वपूर्ण ठरली. या मैदानावर कडक ऊन होते. यावेळी त्यांने केलेली खेळी तेवढीच महत्वाची होती. त्यानंतर विराट फिल्डींगसाठी मैदानात उतरलाही नाही.

टीमच्या विजयानंतर धोनीने आपल्या सवईनुसार स्टंप उखडून आणला. ज्यावेळी टीमला शुभेच्छा देण्यासाठी मैदानात आलेल्या सहकाऱ्यांमध्ये विराटही होता. धोनीने अचानक कोहलीच्या दिशेने स्टंप फेकला आणि विराटने कॅच करत तो स्वीकारला. धोनीकडून विराटने शतक केल्याची ही गिफ्ट असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.