गेलने त्या वादावर पडता टाकण्यासाठी मुलीचं नाव ब्लश ठेवलं

वेस्टइंडीजचा धडाकेदार बॅट्समन आणि आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडून ओपनिंग करणारा क्रिस गेल सध्या त्याच्या घरी गेलाय. त्यामुळे २ मॅच तो खेळू शकणार नाही आहे. क्रिस गेल याला कन्यारत्न प्राप्त झाली आहे. क्रिस गेलने कन्येचं नाव ब्लश असं ठेवलं आहे.

Updated: Apr 21, 2016, 05:56 PM IST
गेलने त्या वादावर पडता टाकण्यासाठी मुलीचं नाव ब्लश ठेवलं title=

मुंबई : वेस्टइंडीजचा धडाकेदार बॅट्समन आणि आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडून ओपनिंग करणारा क्रिस गेल सध्या त्याच्या घरी गेलाय. त्यामुळे २ मॅच तो खेळू शकणार नाही आहे. क्रिस गेल याला कन्यारत्न प्राप्त झाली आहे. क्रिस गेलने कन्येचं नाव ब्लश असं ठेवलं आहे.

तुम्हाला कदाचित आठवत असेल काही दिवसांपूर्वी गेल हा एका वादात सापडला होता. ऑस्ट्रेलियाच्या महिला अँकरसोबत फ्लर्ट केल्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला होता. गेल बोलला होता की, 'I wanted to come and have an interview with you as well. This is the reason why I'm here. Just to see your eyes for the first time," Gayle said. "So hopefully we can win this game and then we can have a drink after. Don't blush, baby.'

या घटनेनंतर इतर काही महिला पत्रकारही पुढे आल्या आणि त्यांनी ही गेलबाबत तक्रारी केल्या. क्रिस गेलला या प्रकरणावर दंड देखील लावण्यात आला होता. त्यामुळे नेहमी या शब्दाने महिलांना फ्लर्ट करणाऱ्या गेलने तिच्या मुलीचं नाव ब्लश ठेवलं. या वादावर गेलने पडता टाकण्यासाठी मुलीचं नाव ब्लश ठेवलं. त्यामुळे आता यावर ही वेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.