अनंत अंबानीच्या जिद्दीला धोनीचाही सलाम

18 महिन्यांमध्ये 108 किलो वजन घटवणाऱ्या अनंत अंबानीची सध्या सोशल नेटवर्किंगवर जोरदार चर्चा सुरु आहे.

Updated: Apr 10, 2016, 05:53 PM IST
अनंत अंबानीच्या जिद्दीला धोनीचाही सलाम title=

मुंबई: 18 महिन्यांमध्ये 108 किलो वजन घटवणाऱ्या अनंत अंबानीची सध्या सोशल नेटवर्किंगवर जोरदार चर्चा सुरु आहे. आपल्या 21 व्या वाढदिवसापर्यंत वजन घटवायचंच असा पण अनंतनं केला होता, आणि त्यानं ते करून दाखवलं.

अनंतच्या या जिद्दीला महेंद्रसिंग धोनीनंही सलाम केला आहे. 100 किलो पेक्षा जास्त वजन कमी करून वाढदिवसाच्या दिवशी तू स्वत:ला सगळ्यात चांगलं गिफ्ट दिलं आहेस, असं ट्विट धोनीनं केलं आहे. 

 

108 किलो वजन कमी करण्यासाठी अनंतनं शस्त्रक्रिया केल्याचं बोललं गेलं, पण रोज 5 ते 6 तास व्यायाम, 21 किमीचा वॉक आणि योगाकरून अनंतनं वजन घटवलं.