धोनी - विराट एकसाथ तो क्या हो बात...

भारत - साऊथ आफ्रिका दरम्यान पाच वनडे मॅचच्या सीरिजचा तिसरी मॅच रविवारी राजकोटमध्ये खेळली जाणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, प्रॅक्टीस मॅच दरम्यान धोनी आणि विराट यांच्यात चांगली ट्युनिंग दिसून आली. 

Updated: Oct 17, 2015, 06:19 PM IST
धोनी - विराट एकसाथ तो क्या हो बात...  title=

राजकोट : भारत - साऊथ आफ्रिका दरम्यान पाच वनडे मॅचच्या सीरिजचा तिसरी मॅच रविवारी राजकोटमध्ये खेळली जाणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, प्रॅक्टीस मॅच दरम्यान धोनी आणि विराट यांच्यात चांगली ट्युनिंग दिसून आली. 

या सीरिजमध्ये १-१ नं दोन्ही टीम्स बरोबरीत आहेत. या मॅचसाठी दोन्ही टीम्स राजकोटमध्ये दाखल झाल्यात... आणि त्यांनी प्रॅक्टीसलाही सुरुवात केली. इंदोरमध्ये २२ रन्सनं मिळालेल्या विजयानंतर खेळाडुंच्या बॉडी लँग्वेजमध्ये खूप सकारात्मकता दिसून येतेय. सगळ्या खेळाडुंनी क्रिकेटसोबतच फुटबॉलही खेळला. 

अधिक वाचा - विराट नाही, अजिंक्यच तिसऱ्या स्थानावर खेळणार; धोनीचा फैसला!

यावेळी, कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांना एकत्रच प्रॅक्टीस करताना पाहिलं गेलं. दोघं एकमेकांसोबत खूपच सहज होते... आणि एकमेकांची मजा-मस्करीही करत होते. 

अधिक वाचा - जिंकल्यानंतरही पराभूत झाला कर्णधार धोनी!

धोनी आणि विराट यांच्यात अजिंक्य राहाणेवरून काही मतभेद असल्याच्या चर्चेनंतर दोघांचं हे वागणं बऱ्याच जणांना कोड्यात टाकणारं होतं. तरीही, दोघांची ही समंजस खेळी भारतीय टीमच्या पथ्यावरच पडेल यात शंका नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.