वर्ल्ड कप 2015 साठी संभावित खेळाडूंची निवड उद्या

Updated: Dec 3, 2014, 09:24 PM IST
वर्ल्ड कप 2015 साठी संभावित खेळाडूंची निवड उद्या title=

युवराज, सेहवाग, गंभीर, भज्जी मिळणार संधी 

मुंबई : ऑस्ट्रेलिया आणि न्यूजीलंड दरम्यान पुढील वर्षी १४ फेब्रुवारी ते २९ मार्च पर्यंत होणाऱ्या  विश्व चषकासाठी ३० संभावित खेळाडूंची निवड उद्या (गुरूवारी) मुंबईमध्ये करण्यात येणार आहे.

विश्व चषक २०११ मध्ये विजेता राहिलेल्या संघातील युवराज सिंग, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, हरभजन सिंग आणि आशीष नेहरा यांना संधी मिळणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे. टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग काल सांगितले की, आशा आहे की विश्व चषकाच्या संभाव्य ३० संभावित खेळाडूंमध्ये स्थान मिळू शकते. निवड समिती यावर विचार करू शकते. 

संदीप पाटीलच्या नेतृत्वाखालील ५ सदस्यीय निवड समितीची बैठक गुरूवार दुपारी एक वाजता होणार आहे. बीसीसीआय सचिव संजय पटेलने ही माहिती दिली. सध्या युवराज सिंग, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, हरभजन सिंग आणि आशिष नेहरा सध्या खराब फॉर्मशी सामना करीत आहेत. विश्व चषक २०११मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा खिताब मिळाला होता. सध्या तोही फॉर्मशी झगडत आहे.  त्यामुळे त्याला सुरूवातीच्या ३० जणांमध्ये स्थान मिळते की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

युवराजने विजय हजारे ट्रॉफीमध्ये केवळ अर्धशतक केले होते. संघात रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांना गोलंदाज आणि फलंदाजीसाठी संधी मिळण्याची शक्यता आहे.

वीरेंद्र सेहवागला ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यावर खेळण्याची सवय आहे. पण आता तो चांगल्या फॉर्मशी झगडत आहे. उत्तर विभागाकडून खेळताना त्याने हरियाणा विरूध्द ८० धावांची खेळी केली होती.  
दिल्लीचा त्याचा साथीदार गौतम गंभीरही २०११च्या विजयी टीमचा सदस्य आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.