मुंबईचा लाजीरवाणी कामगिरी, ४४ धावांत खुर्दा

रणजी ट्रॉफीमध्ये विनय कुमारनं मुंबईच्या टीमची अक्षरक्ष: दाणादाण उडवून दिली. कर्नाटकनं मुंबईचा पहिल्या इनिंगमध्ये अवघ्या ४४ रन्समध्येच धुव्वा उडवला. 

Updated: Feb 25, 2015, 07:15 PM IST
 मुंबईचा लाजीरवाणी कामगिरी, ४४ धावांत खुर्दा title=
सौजन्य - यू ट्यूब

मुंबई : रणजी ट्रॉफीमध्ये विनय कुमारनं मुंबईच्या टीमची अक्षरक्ष: दाणादाण उडवून दिली. कर्नाटकनं मुंबईचा पहिल्या इनिंगमध्ये अवघ्या ४४ रन्समध्येच धुव्वा उडवला. 

मुंबईच्या केवळ दोन बॅट्समनना दोन आकडी धावसंख्या गाठता आली. तर तब्बल चार बॅट्समनना भोपळाही फोडता आला नाही. विनय कुमारनं मुंबईच्या सर्वाधिक सहा विकेट्स घेतल्या. तर अरविंद श्रीनाथनं दोन आणि अभिमन्यू मिथुननं एक विकेट घेतली.

कर्नाटकला पहिल्या इनिंगमध्ये 202 रन्सवर गुंडाळल्यानंतर मुंबईच्या टीमची सेमी फायनल मॅचवर पकड मजबूत वाटत होती. मात्र, विनय कुमारच्या अचूक बॉलिंगसमोर मुंबईच्या टीमनं कर्नाटकसमोर सपशेल लोटांगण घातलं.

पहिल्या दिवसअखेर कर्नाकटनं 2 विकेट्स गमावून 10 रन्स केले आहेत. आता मॅचच्या दुस-या दिवशी मुंबईची टीम कमबॅक करते का ते पाहण महत्त्वाच ठरणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.