नागपूर : तिसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुनही भारतच पराभूत झाला आहे. तुम्हांला वाटेल ही कसली बातमी... पण हे खरं आहे.... पहिला सामना भारताने जिंकला. दुसरा सामना हा पावसाच्या व्यत्यामुळे रद्द झाला त्यामुळे सगळ्यांचं लक्ष हे तिसऱ्या सामन्याकडे होतं.
तिसरी टेस्ट भारताने जिंकली पण खराब पिचमुळे भारत हारला कारण अनेक दिग्गज खेळाडूंनी नागपूरच्या पीचवर जोरदार टीका केली.
पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज वसीम अकरम याने म्हटलं की 'आता आयसीसीनेच संपूर्ण जगात पिच बनवण्यास सुरुवात केली पाहिजे किंवा मग अंक कमी केले पाहिजे ज्याचा क्रिकेट रँकिंगवर सरळ परिणाम होईल. नाहीतर तोपर्यंत आपल्याला आखाड्यासारखीच पिच मिळत राहतील.'
जॅक कॅलीसने म्हटलं की 'तुम्ही कोणत्याही स्पिनरला विचारा की त्याला सामान्य पीचवर बॉलिंग करायला आवडेल का जेथे स्कोर हा 400 हुन अधिक होऊ शकतो किंवा कोरड्या पीचवर जेथे फक्त 200 रन्सचा बचाव करायचा आहे. मला वाटतं अधिकतर गोलंदाज हे पहिला पर्याय निवडतील.'
ऑस्ट्रेलियाच्या माईकल वॉनने म्हटलं की 'नागपूरचं पीच टेस्ट क्रिकेटच्या हिशोबाने खूपच खराब होतं.'
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.