भारतीय अंध क्रिकेट टीमचा भीमपराक्रम, इंग्लंडला व्हाईटवॉश

इंग्लंड देशात भीमपराक्रम गाजवणारी भारतीय अंध क्रिकेट टीम मायदेशी परतलीय. वनडे, टी-२० क्रिकेटमध्ये इंग्लंडला व्हाईट वॉश देण्याचा पराक्रम भारतीय अंध क्रिकेट टीमनं केलाय.

Updated: Jun 5, 2015, 05:13 PM IST
भारतीय अंध क्रिकेट टीमचा भीमपराक्रम, इंग्लंडला व्हाईटवॉश title=

नवी दिल्ली : इंग्लंड देशात भीमपराक्रम गाजवणारी भारतीय अंध क्रिकेट टीम मायदेशी परतलीय. वनडे, टी-२० क्रिकेटमध्ये इंग्लंडला व्हाईट वॉश देण्याचा पराक्रम भारतीय अंध क्रिकेट टीमनं केलाय.

शेखर नाईकच्या नेतृत्वात टीम इंडियानं ही कामगिरी करुन दाखवलीय. बॉलिंग, बँटिंग आणि फिल्डिंगमध्ये टीम इंडियाचा परफॉर्मन्स वर्ल्ड चॅम्पियनप्रमाणेच होता. भारतीय अंध क्रिकेट टीमचा इथपर्यंतचा हा प्रवास थक्क करणारा असा आहे.

बीसीसीआयची मान्यता नसूनही टीमनं चमकदार कामगिरी केली. आता इंग्लंडमधील कामगिरीनंतर तरी भारतीय अंध क्रिकेट टीमला बीसीसीआयची मान्यता मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते.

भारतीय टीमनं इंग्लंडला त्यांच्याच देशात जाऊन पराभूत करण्याचा पराक्रम केला खरा, मात्र त्यामुळे अंध खेळाडूंकडे होत असलेलं दुर्लक्ष नजरेआड करता येणार नाही. 

बारामतीचा फास्ट बॉलर अमोल खर्चे हा अशांपैकीच एक. वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करूनही केवळ आर्थिक पाठबळ नसल्यामुळे इंग्लंडमधल्या या विजयात त्याला सहभागी होता आलं नाही. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.