नवी दिल्ली : सर्व भारतीयांचा फेव्हरेट पहलवान खली उर्फ दलीप सिंह राणा याने WWE मधील आपल्या एका किसिंग सीनबद्दल खुलासा केला आहे.
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत खली म्हणाला की, माझ्या पत्नीने WWEच्या एका सग्मेंटमध्ये एका महिला रेसलर्सला किस करताना पाहिले तेव्हा तीने त्वरित घऱी यायला सांगितले होते.
खली म्हटला की, हा किसिंग सीन पाहिल्यावर माझ्या पत्नीला राग आला, तिला वाटत होते की लगेच घऱी यायला हवे. मी जे काम करतो ते सातत्याने करतो, त्यात लाज आणि भीती का वाटायला हवी. मी मजुरी आणि पोलीसाची नोकरी केली आहे, खूप मेहनत केली आहे. ज्या प्रकारे त्या ठिकाणी लढलो आहे, त्यासाठी खूप मेहनत केली आहे.
हा किसिंग सीन WWEमध्ये करण्यात आलेल्या एका प्रोफेशनल कमिटमेंटचा भाग होतो.