गुजरातचा बैंगलोरवर 6 विकेट्सनं विजय

आयपीएलमध्ये गुजरात लायन्स विरुद्धच्या सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरचा 6 विकेट्सनं पराभव झाला आहे.

Updated: Apr 24, 2016, 08:41 PM IST
गुजरातचा बैंगलोरवर 6 विकेट्सनं विजय title=

राजकोट: आयपीएलमध्ये गुजरात लायन्स विरुद्धच्या सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरचा 6 विकेट्सनं पराभव झाला आहे. विराट कोहलीनं मारलेल्या शानदार सेंच्युरीही बैंगलोरला वाचवू शकली नाही. 

या मॅचमध्ये टॉस जिंकून बैंगलोरनं पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पण  ओपनिंगला आलेले कोहली आणि वॉटसनला मोठी पार्टनरशीप करता आली नाही. वॉटसन फक्त 6 रनवर आऊट झाला, तर त्यानंतर आलेला एबी डिव्हिलियर्सलाही 20 रन बनवता आले. 

यानंतर मात्र कोहली आणि के.एल.राहुलनं बैंगलोरला 20 ओव्हरमध्ये 180 रनपर्यंत पोहोचवलं. कोहलीनं 63 बॉलमध्ये नाबाद 100 रन केल्या आणि के.एल.राहुलनं 35 बॉलमध्ये नाबाद 51 रन केल्या. 

181 रनचा पाठलाग करायला आलेल्या गुजरातची सुरुवात चांगली झाली. ओपनिंगला आलेल्या स्मिथ(32) आणि मॅक्कलमनं(42) गुजरातचा स्कोर 5 ओव्हरमध्येच 47 पर्यंत नेला. त्यानंतर आलेल्या रैना आणि दिनेश कार्तिकनं गुजरातचा विजय सोपा केला. कार्तिकनं 39 बॉलमध्ये नाबाद 50 तर रैनानंही 24 बॉलमध्ये 28 रन केल्या.