द. आफ्रिका-बांगलादेश पहिल्या टी-२० मॅचसोबतच क्रिकेटचे नवे नियम लागू

बांगलादेशमध्ये बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सीरिज सुरू होणार आहे. या सीरिजसोबतच टेस्ट, वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील नवे नियम लागू होणार आहे.

Updated: Jul 6, 2015, 08:43 PM IST
द. आफ्रिका-बांगलादेश पहिल्या टी-२० मॅचसोबतच क्रिकेटचे नवे नियम लागू  title=

मुंबई: बांगलादेशमध्ये बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सीरिज सुरू होणार आहे. या सीरिजसोबतच टेस्ट, वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील नवे नियम लागू होणार आहे.

बॅटिंग पॉवर प्ले संपला

वन-डे इंटरनॅशनल मॅचमध्ये जे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. त्यात १० ओव्हरमध्ये कॅचिंग पोझिशनमध्ये फिल्डर लावणं बंधनकारक आणि बॅटिंग पॉवरप्ले संपलाय. शिवाय अखेरच्या १० ओव्हरदरम्यान पाच फिल्डर्सला सर्कल बाहेर ठेवण्याची परवानगी असेल. 

कॅप्टनला हवं असेल तर हाफ टाइम पुढे वाढवू शकतो

वन-डे मॅचमध्ये इनिंगच्या हाफ टाइम संदर्भातील नियमांनुसार, जर दुसरी टीम बॅटिंग करत असेल आणि मॅचचा रिझल्ट जवळ आला असेल तर अशात दोन्ही टीममधील कोणताही कॅप्टन अंपायरला मॅच १४ मिनिट किंवा कमीतकमी ४ ओव्हर पुढे ढकलण्याची विनंती करू शकतो. 

वन-डे आणि टी-२०मध्ये सर्व प्रकारच्या नो बॉलवर फ्री हिटची मंजुरी असेल. निर्धारित संख्येपेक्षा अधिक क्षेत्ररक्षकांना सर्कलच्या बाहेर राहिल्यामुळे जर नो बॉल दिला गेला तर तो फ्रीट हिटसाठी फिल्डिंगमध्ये बदल केला जावू शकतो. दरम्यान, हा बदल फक्त उल्लंघन बरोबर करण्यासाठी असेल. 

शॉटपूर्वी जागा बदलू शकतात फिल्डर

टेस्ट, टी-२० आणि वनडेमध्ये बॅट्समनद्वारे शॉट खेळण्यापूर्वी कोणताही फिल्डर किंवा विकेटकीपर आपली जागा बदलू शकतो. यासंदर्भातील नियमाला मान्यता देण्यात आलीय. क्रिकेटचे तिन्ही फॉर्मेट्समध्ये बॉलरला बॉलिंग करण्यापूर्वी बॉलिंगवाल्या बाजूनं उभ्या असलेल्या बॅट्समनला रन आउट करण्याचा अधिकार असेल.

कोणत्या बॉलरद्वारे एका ओव्हरमध्ये ठराविक बाउंसरपेक्षा जास्त फेकले गेल्यास अंपायरला त्याविरुद्ध रिपोर्ट करण्याचा अधिकार असेल. महिला क्रिकेटच्या कोणत्याही फॉर्मेटमध्ये अद्याप कोणतेही नियम बदलले गेलेले नाहीयेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.