दिल्ली : आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दुसऱ्याच दिवशी टीम इंडियाला मोठा झटका बसलाय. मिळालेल्या माहितीनुसार सलामीवीर रोहित शर्माला दुखापत झाल्याचे समजतेय.
शनिवारी रात्री त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली. आज सकाळी एक्सरे काढण्यात आला. मात्र आता तो ठीक आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार लवकरच त्याची दुखापत बरी होईल.
याआधी स्पर्धा सुरु होण्याआधीच वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीला दुखापत झाल्याने तो संघाबाहेर होता. त्यानंतर सरावादरम्यान धोनीचेही स्नायू दुखावले गेले होते. त्यानंतरही धोनी खेळतोय.
पाकिस्ताविरुद्धच्या सामन्यात रोहित शून्य धावांवर बाद झाला. मात्र सध्याचा तो आघाडीचा फलंदाज आहे आणि तो फॉर्ममध्येही आहे. त्याने अनेकदा भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचललाय. त्यामुळे आशिया कपपूर्वी रोहित दुखापतीतून सावरणे संघासाठी आवश्यक आहे.