चेन्नई : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत तिसऱ्या दिवशी भारताच्या लोकेश राहुलचे द्विशतक एका धावेने हुकले. द्विशतक हुकल्याचे कारण लोकेशने खेळ संपल्यानंतर सांगितले.
द्विशतक करताना माझ्यावर दबाव होता. त्यामुळे माझे द्विशतक हुकल्याची प्रांजळ कबुली त्याने पत्रकारांशी बोलताना दिली. तब्बल 30 वर्षानंतर एखाद्या भारतीय क्रिकेटरचे द्विशतक एका धावेने हुकले. याआधी 1986मध्ये भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीने द्विशतक एका धावेने हुकले होते.
लोकेश राहुलच्या 199 धावांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर भारताने तिसऱ्या दिवसअखेर चार बाद 391 धावांवर मजल मारली होती.
Pressure of getting 200 runs got to me, but I'll go back home happy that I got crucial runs for team-KL Rahul(who scored 199 runs) #IndvsEng pic.twitter.com/AFojpK7LLg
— ANI (@ANI_news) December 18, 2016