सिडनी : आज सेमीफायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यामध्ये जी टीम जिंकेल ती न्यूझीलंडबरोबर थेट फायनलमध्ये खेळणार आहे.
आजच्या या विशेष सामन्यात काही रेकॉर्ड्स आणि फॅक्ट्स-
# स्टीवन स्मिथने वनडे क्रिकेटमध्ये दहा वेळा ५० पेक्षा जास्त रन केले आहेत, विशेष म्हणजे ते सगळे सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. पण आज तसं होऊ नये अशी सर्व भारतीयांना आशा आहे.
# मागील पाच सामन्यात फिंचने केवळ ६४ रन्स बनववले होते, मात्र आजच्या मॅचमध्ये त्याने ८१ रन केले.
# २०१२ पासून भारताची शेवटच्या दहा ओव्हर्समधील बॉलिंग मधील इकोनॉमी ७.६१ आहे आणि ती सर्व टीमच्या तुलनेत सर्वात बेस्ट बॉलिंग इकोनॉमी आहे.
# भारतातर्फे वर्ल्डकपमधील नॉक आऊट सामन्यात ४ विकेट्स घेणारा उमेश यादव पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
# अॅरॉन फिंच आणि स्टीवन स्मिथ १८२ रन्सची भागिदारी ही वर्ल्डकपमधील नॉक आऊट सामन्यातील दुसरी सर्वात मोठी भागीदारी आहे. यापूर्वी पाकिस्तानच्या सईद अनवर आणि वजातुल्लाह ने १९९९ मध्ये यापेक्षा जास्तीची भागिदारी केली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.