मीरपूर: आशिया कपच्या पहिल्याच मॅचमध्ये भारतानं बांग्लादेशचा 45 रननं दारुण पराभव केला.
- या विजयामुळे भारतानं यंदाच्या वर्षी खेळलेल्या 7 टी-20 पैकी 6 मॅचमध्ये विजय मिळवला आहे. या वर्षात सहा विजय मिळवणारी ही एकमेव टीम आहे.
- या मॅचमध्ये धोनीनं टी-20 मध्ये सगळ्यात जास्त 31 कॅच पकडण्याचा विक्रम केला. याआधी हे रेकॉर्ड वेस्ट इंडिजचा विकेट किपर दिनेश रामदिनकडे होतं. त्यानं आत्तापर्यंत 30 कॅच पकडले आहेत.
- युवराज सिंगनं 1 हजार रनचा पल्ला गाठला. असं करणारा तो चौथा भारतीय ठरला आहे. त्याच्या आधी विराट कोहली (1223), रोहित शर्मा (1149), आणि सुरेश रैना (1136) यांनी एक हजार रन पूर्ण केल्या.
- रोहित शर्मानं 55 बॉलमध्ये 83 रनची खेळी करून भारताचा विजय सोपा केला. रोहितचा हा स्कोर कोणत्याही भारतीयाचा बांग्लादेश विरुद्धचा सर्वाधिक स्कोर आहे. याआधी विराट कोहलीनं ढाक्यात 50 बॉलमध्ये 57 रनचा विक्रम केला होता.
- रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं आत्तापर्यंत लगावलेल्या हाफ सेंच्युरींपैकी 9 वेळा भारताचा विजय झाला आहे. फक्त ब्रेंडन मॅक्कलम 12 हाफ सेंच्युरींसह या दोघांच्या पुढे आहे.
- आशिष नेहरानं या मॅचमध्ये 23 रनच्या मोबदल्यात 3 विकेट घेतल्या. टेस्ट खेळणाऱ्या कोणत्याही देशाविरोधातली आशिष नेहराची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
- हार्दिक पांड्यानं या मॅचमध्ये 18 बॉलमध्ये 31 रनची खेळी केली. हा त्याचा सर्वाधिक स्कोर आहे.
- भारतानं आत्तापर्यंत बांग्लादेशविरुद्ध खेळलेल्या सर्व 3 मॅचमध्ये विजय मिळवला आहे.
- रोहितनं या मॅचमध्ये लगावलेली हाफ सेंच्युरी त्याची 11 वी आहे. एवढ्या सेंच्युरी लगावणारा रोहित पाचवा बॅट्समन ठरला आहे. त्याच्याआधी विराट कोहली(12), तिलकरत्ने दिलशान (12), ख्रिस गेल (14), ब्रेंडन मॅक्कलम(15) यांनी जास्त हाफ सेंच्युरी लगावल्या आहेत.