नवी दिल्ली : क्रिकेट बादशाह सचिन तेंडुलकरला ब्रिटीश एअरवेजचा कारभार डोकेदुखी ठरला. जागा उपलब्ध असूनही सचिनला तिकिट नाकारण्यात आल्याने त्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत त्याने ट्विट केलेय.
विमानात जागा उपलब्ध असतानाही माझ्या कुटुंबातील सदस्यांचे वेटिंग तिकिट कन्फर्म होऊ शकले नाही. त्यामुळे ब्रिटीश एअरवेजच्या कारभाराबाबत नाराज आणि हताश झालोय, असे ट्विट सचिने केलेय.
सचिनने ब्रिटीश एअरवेजकडून प्रवाशांना मिळणाऱ्या वागणुकीवरही तीव्र संताप व्यक्त केलाय. ही कंपनी बेजबाबदार आणि अव्यावसायिक आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून नेहमीच चुकीच्या ठिकाणाचे टॅक लगेचवर लावले जातात. त्याबाबत कोणतीही काळजी घेतली जात नाही, असेही सचिनने ट्विट करताना म्हटलेय.
सचिनला पत्नी अंजली आणि मुलांसोबत इंग्लंडमध्ये जायचे होते. मात्र, त्यांच्या तिकिटांचे आरक्षणच झाले नाही. त्यामुळे सचिन संतापला आणि त्याने हे ट्विट केले.
Angry Disappointed and Frustrated.. #BAdserviceBA Family member's Waitlisted ticket not confirmed despite seats being available (1/2)
— sachin tendulkar (@sachin_rt) November 13, 2015
And luggage being tagged by @British_Airways to wrong destination and don't care attitude! #NeveronBA (2/2)
— sachin tendulkar (@sachin_rt) November 13, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.