मेलबर्न : भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झाचं सातवं ग्रँडस्लॅम जिंकण्याचं भंग पावलं. सानिया आणि क्रोएशियन इव्हान डोडिंग जोडीला ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये पराभव सहन करावा लागला.
फायनलमध्ये इंडो-क्रोएशियन जोडीवर अबिंगल स्पिअर्स आणि ज्युआन सेबेस्टाईन कबाल जोडीनं 6-2, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला.
पहिला सेट गमावल्यानंतर सानिया-डोडिंग जोडीनं कमबॅक केलं होतं. मात्र, स्पिअर्स-कबाल जोडीच्या धडाक्यापुढे काहीच चाललं नाही. आता सानियाला सातवं ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी आणखी वाट पहावी लागेल.