इंग्लंडच्या भारत दौऱ्याच्या तारखांची घोषणा

नोव्हेंबरमध्ये इंग्लंडची क्रिकेट टीम भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. इंग्लंडच्या या दौऱ्यामध्ये 5 टेस्ट मॅच 3 वनडे आणि 3 टी20 चा समावेश आहे.

Updated: Jul 15, 2016, 04:25 PM IST
इंग्लंडच्या भारत दौऱ्याच्या तारखांची घोषणा  title=

मुंबई : नोव्हेंबरमध्ये इंग्लंडची क्रिकेट टीम भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. इंग्लंडच्या या दौऱ्यामध्ये 5 टेस्ट मॅच 3 वनडे आणि 3 टी20 चा समावेश आहे. 9 नोव्हेंबरपासून इंग्लंडच्या या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. 

या दौऱ्यामध्ये मुंबईत एक टेस्ट, पुण्यात एक वनडे आणि नागपूरमध्ये एक टी20 होणार आहे. टेस्ट सीरिज झाल्यानंतर इंग्लंडची टीम ख्रिसमससाठी इंग्लंडला जाणार आहे. यानंतर जानेवारीमध्ये पुन्हा इंग्लंडची टीम वनडे आणि टी20 सीरिजसाठी पुन्हा भारतात येईल. 15 जानेवारीपासून वनडे सीरिजला सुरुवात होईल. 

असा असेल इंग्लंडचा भारत दौरा 

टेस्ट सीरिज

पहिली टेस्ट- राजकोट- 9 नोव्हेंबर 2016

दुसरी टेस्ट- विशाखापट्टणम- 17 नोव्हेंबर 2016

तिसरी टेस्ट- मोहाली- 26 नोव्हेंबर 2016

चौथी टेस्ट- मुंबई- 8 डिसेंबर 2016

पाचवी टेस्ट- चेन्नई- 16 डिसेंबर 2016

वनडे सीरिज

पहिली वनडे- पुणे- 15 जानेवारी 2017

दुसरी वनडे- कटक- 19 जानेवारी 2017

तिसरी वनडे- कोलकता- 22 जानेवारी 2017

टी 20 सीरिज

पहिली टी20- कानपूर- 26 जानेवारी 2017

दुसरी टी20- नागपूर- 29 जानेवारी 2017

तिसरी टी20- बंगळुरू- 1 फेब्रुवारी 2017