बार्बाडोस : वेस्ट इंडीजचा मधल्या फळीतील फलंदाज शिवनारायण चंद्रपॉलने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
चंद्रपॉलने आपल्या २२ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत १६४ कसोटी आणि २६८ एकदिवसीय सामन्यांत वेस्ट इंडीजचे प्रतिनिधित्व केले आहे. तो वेस्ट इंडीजचा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनविणारा दुसरा फलंदाज आहे. त्याने ११,८६७ धावा केल्या आहेत. तर, ब्रायन लाराच्या ११,९५३ धावा आहेत.
चंद्रपॉलने आपला निवृत्तीचा निर्णय वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाला ई-मेल द्वारे कळविला आहे. वेस्ट इंडीज मंडळाचे अध्यक्ष डेव्ह कॅमरुन यांनी त्याला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. चंद्रपॉल दुबईत होणाऱ्या मास्टर्स चॅम्पियन्स लीग (एमसीएल) स्पर्धेत खेळणार आहे.