नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं निमित्त साधून विराट कोहलीने दोन महिलांचे आभार मानलेत... यातील एक महिला म्हणजे त्याची आई... आणि दुसरी म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्मा...
या दोघींचे फोटोही विराटनं शेअर केलेत. 'माझ्या आयुष्यातील दोन विशेष आणि कणखर महिलांसोबत सर्वांनाच महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... आयुष्यातील खडतर प्रसंगातही आमच्या कुटुंबाची काळजी घेणारी माझी आई आणि संकटांचा सामना करुन प्रामाणिकपणे लढणारी आणि परिस्थिती बदलवणारी अनुष्का शर्मा...' असं त्यानं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
आजच्या दिवशी सगळेच स्त्रियांच्या बाबतीतला आपल्या मनातला आदर व्यक्त करत आहेत. विराटनेही आपल्या सोबतच्या महत्त्वाच्या दोन्ही महिलांना या पोस्टमधून धन्यवाद दिले.
विराटच्या अनेक पोस्टमधून तो त्याच्या आईच्या किती जवळ आहे, हे नेहमीच दिसत असतं. इतकंच नव्हे तर या व्हॅलेंटाईन्स डेला त्याने अनुष्काचा उल्लेख करून एक भावनिक पोस्ट केली होती. प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्षपणे दोघंही आपल्या नात्याविषयी असं जाहीरपणे बोलत असतात.
विराट कोहली आणि संघाने कालच ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवला. भारतीय संघ आता बंगळुरुत आहे.